उस्मानाबाद / प्रतिनिधी:

उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून यशवंतराव चव्हाण यांची ख्याती होती. यशवंतराव चव्हाण यांनी शेती मालकीहक्कासह भूमिहीनांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला. ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योग यांची सांगड घालत शहराकडे धावणाऱ्या श्रमिकांचा लोंढा रोखण्यासाठी औद्योगिक विकासाचा मास्टरप्लॅन मांडला.ते रसिक आणि साहित्यिक म्हणूनही सुपरिचित होते.

त्यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  अस्मिता कांबळे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक एस.बी. कारभारी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा उजाळा सभागृहासमोर ठेवला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले,कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.वी.सावंत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बी.आर.हजारे,वरिष्ठ सहाय्यक एफ.एस.पटेल, मधुकर कांबळे,घुटे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख, वरिष्ठ सहाय्यक व कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षा अंतर ठेवून जयंती कार्यक्रमाला उपस्थित होते.


 
Top