उमरगा/ प्रतिनिधी:

उमरगा तालुक्यातील अपात्र शिधापत्रिकाचीं शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी आपली संपूर्ण माहिती भरून प्रशासनास सहकार्य करावे. ज्यांच्या कडे गॅस कनेक्षण आल्यास तशी नोंद करावी त्यामुळे कुणाचीही शिधा पत्रिका रद्द होणार नाही असे आवाहन  तहसीलदार संजय पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र शासन अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक शिवाप 2021 / प्र.क्र .04 / नापु - दिनांक 28 जानेवारी 2021 अन्वये राज्यातील अपात्र शिधापत्रीकांची शोधमोहिम राबविण्यात येत असून त्या संदर्भात काही वर्तमानपत्रात गॅस सिलेंडर आणाऱ्या नागरीकांची शिधापत्रीका रद्य होणार या मथळ्याखाली चुकीचे व शिधापत्रीकाधारकांची दिशाभुल करणारे वृत्त प्रसिद्ध केले  असल्याचे निर्दशनास आले आहे . या प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे सर्व शिधापत्रीका धारकाना अहवान करण्यात येते की , अपात्र शिधापत्रीका तपासणी दरम्याण आपणास पुरविण्यात आलेल्या फॉर्ममध्ये अचूक माहिती भरुन त्यासोबत रहिवास पुरावा व कुटुंबातील सर्व व्यक्तीचे आधार ची छायांकीत प्रत सादर करणे आवश्यक आहे . तसेच आपले कुटूंबात कोणत्याही व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्याची माहिती फॉर्म मध्ये नमूद करणे आवश्यक असून तसे नोंदविल्याने आपली शिधापत्रीका रद्द होणार असल्याबाबत वरील शासन निर्णयामध्ये नमूद केलेले नाही . तसेच ज्यांचे कुटुंबात गॅस कनेक्शन नाही अशा कुटूंबानी फॉर्म मधील गॅस नसले बाबतचे हमीपत्र भरुन देणे आवश्यक आहे . तरी  तालुक्यातील सर्व शिधापत्रीका धारकानी आपले कुटूंबाची परीपुर्ण माहिती संबधित तपासणी कर्मचारी यांना उपलब्ध करुन द्यावी व अपात्र शिधापत्रीका शोधमोहिमेस प्रशासनास सहकार्य करावे असे म्हटले आहे

 
Top