वाशी / प्रतिनिधी :  

65 लाखाचा गांजा पकडून  वाशी पोलिसांनी मोठी कार्यवाही केली  आहे. 619 किलो वजनाचा हा गांजा पारगाव ता. वाशी  येथील जवळका फाटा येथे 17 मार्च रोजी रात्री १२:३०  वाजता पकडण्यात आला.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की १७ मार्च रोजी सोलापूर - धुळे  या राष्ट्रीय महामार्गावरून गांजा ने भरलेली पिकप क्र. ए. पी.- ३६ टी.बी. १६५२  जात होती.  ही गाडी पारगाव ता. वाशी येथे जवळका फाटा या ठिकाणी आली असता बंद पडली. यावेळी काही लोकांनी ही गाडी का बंद पडली हे पाहण्यासाठी गेले. हे लोक  येथे गेले असता त्या गाडीतील दोघे जण पळून गेले. त्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाले. एवढ्यात रात्रीची गस्त घालणारी वाशी पोलीस स्टेशनची गाडी रात्री 12:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचली. पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता या गाडीमध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ गांजा ने भरलेली गाडी आपल्या ताब्यात घेतली. या गाडीमध्ये 619 किलो गाजा आढळून आला. या गांजाची किंमत 64 लाख 97 हजार 950 रुपये असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक चौरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इस्मा विरुद्ध 20 एन. डी. पी. एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख हे करत आहेत.

 

 
Top