उमरगा / प्रतिनिधी:

 तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन व्हीडीओ कॉन्फरंसींग द्वारे दिनांक ११ रोजी उत्साहात संपन्न झाली .

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोवीड १९  नियमानुसार ऑनलाइन व्हीडीओ कॉन्फरंसींग द्वारा माध्यमातून चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या तसेच सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाली . 

भाऊसाहेब  बँकेस सन १९-२० मध्ये ८६ लाख ९५ हजार रुपये निव्वळ नफा असुन .   बँकेच्या ठेवी मार्च २० अखेर ६६४९ .६१ लक्ष रुपये आहे . चालू सालामध्ये कांही दिवसात बँक सुसज्ज अशा  स्वतःच्या नूतन वास्तूत स्थलांतरित होणार आहे . बँकेची १९९६ साली स्थापना झाली असून बँकेने रोप्य मोहत्सवी वर्षात यशस्वी वाटचाल केलेली आहे . बँक स्थापनेपासून सतत अ वर्ग ऑडिटमध्ये असून सातत्याने नफ्यात आहे . बँकेचे भाग भांडवल ४२६ .३२ लाख असुन राखीव व इतर निधी ७७४ .१९ लाख आहे . बँकेच्या ठेवी मध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे . बँकेने आरबीआय च्या सर्व निकषांचे पालन केले असून बँकेने सर्वसामान्यांचा विश्‍वास संपादन केलेला आहे . बँकेचे हे रोप्यमोहत्सवी वर्ष असल्याने कर्जदारांसाठी आकर्षक व्याजदराची विशेष योजना जाहीर करण्यात येणार असल्याचे चेअरमन प्रा . सुरेश बिराजदार  यांनी बोलताना मत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन श्री बिराजदार यांनी   विषय  पत्रिकेचे वाचन बँकेचे सरव्यवस्थापक रमेश शहापुरे यांनी केले तर आभार विजयकुमार सोनवणे यांनी व्यक्त केले . 

 यावेळी संचालक सुनील माने, विजयकुमार सोनवणे, डॉ . मल्लिनाथ मलंग , गोविंदराव साळुंखे, प्रा . सतीश इंगळे ,इंद्रजीत घोडके, संजय गायकवाड, कार्यकारी संचालक रमेश शहापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती . चिफ् अकाउंटन्ट संदीप जाधव ,कर्ज विभाग प्रमुख दयानंद बिराजदार, वसुली अधिकारी सुरेंद्र पौळ , अमोल पाटील , आयटी विभाग प्रमुख विजय चव्हाण, सतीश सुरवसे, संतोष शिरगुरे , पवन जगताप, वर्षा गायकवाड, मेघा जगदाळे, विनोद जाधव. प्रशांत साळुंखे, राजु राठोड, बळी चव्हाण आदी कर्मचाऱ्यांसह सभासद ऑनलाइन मीटिंगमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 
Top