उमरगा / प्रतिनीधी

उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा वर्षापासून कासवगतीने सुरू असून, रस्त्याचे काम निकृष्ट हाेत अाहे तसेच महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाची सुविधा करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना जिल्ह्यातील शिष्टमंडळाने दिले.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे कान निकृष्ट झाले असून, गेल्या सहा वर्षापासून संथगतीने सुरू आहे. महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करण्यात आले नसल्यामुळे महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणचे उड्डाणपूलाचे काम अपूर्ण असताना कंत्राटदाराने सक्तीने पथकर वसुली सुरू केली असून, टोलवसुलीच्या विरोधात बलसूर-सास्तुर जाणाऱ्या महत्त्वाच्या व वर्दळीच्या रस्त्यावर भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाचे मागणीसाठी, महामार्गालगत असलेल्या दाळींब, रामपूर, जकेकुर, दाबका, दस्तापुर, येळी, त्रिकोळी, मुळज गावांतील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाची सोय करण्यात यावे,यासह अन्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी निवेदन देऊन व आंदोलने करूनही संबंधित विभाग व ठेकेदाराने काम रेटून नेल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे. दिल्ली येथे बुधवारी यासंदर्भात शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेराजेनिंबाळकर, माजी आमदार राहुल मोटे, आमदार कैलास पाटील,सुरेश बिराजदार, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दीपक जवळगे उपस्थित होते.

  उपाययाेजनेचे आश्वासन,

प्रा. सुरेश बिराजदार म्हणाले, महामार्गालगतच्या गाव, मोड येथे सुरक्षितेच्या दृष्टीने पर्यायी उपाययोजना करण्याविषयी केद्रींय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत फोनवरून सूचना दिल्याचे प्रा.सुरेश बिराजदार यांनी सांगितले.

 
Top