उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महिला विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या महिला समाज सेविकांना आणि संस्थांना पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महाराष्ट शासनाच्या बालविकास विभागाकडून प्रदान करण्यात येतो.या पुरस्कारांसाठी 2015-16 ते 2019-2020 या कालावधीसाठी वर्षनिहाय प्रस्ताव दि.15 मार्च-2021 पर्यंत मागवण्यात येत आहेत.पात्र संस्था आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

 राज्यस्तरीय पुरस्कार:-महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षे उल्लेखनीय कार्य करणा-या समाज सेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.एक लाख रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे  पुरस्काराचे  स्वरुप आहे.विभागीय स्तर पुरस्कार:-महिला व बालविकास क्षेत्रात किमान दहा वर्षे उल्लेखनीय कार्य करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना 25 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्कार स्वरुप आहे. जिल्हा स्तरीय पुरस्कार:- महिला व बालविकास क्षेत्रात किमान दहा वर्षे उल्लेखनीय कार्य करणा-या समाज सेविकांना दर वर्षी हा पुरस्कार  दिला जातो.पुरस्कारचे स्वरुप 10,001 रोख रुपये, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

 पुरस्कारासाठी पात्र महिला समाज सेविका व स्वयंसेवी संस्थांना यांनी विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह तीन प्रतीत प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत. ज्या महिला समाजसेविका आणि स्वयंसेवी संस्थांना या पूर्वी पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त  झाला असेल तसेच दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. तसेच अटी शर्ती आणि माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, खोली क्र.10 तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. 

 
Top