उमरगा / प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील माडज येथे एसबीआय बँकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त उमेद अंतर्गत 14 बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे 14 लाख कर्जाचे वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश पाटील तर प्रमुख पाहुणे बँक मॅनेजर सुयोग वाजे, उमेद तालुका व्यवस्थापक बाबासाहेब नाईक उमेद तालुका व्यवस्थापक मनोज कवडे प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर औरादे दिनेश निनावे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन बँक मॅनेजर सुयोग वाजे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमेद बचत गटातील 14 गटांना एक लाख रुपये प्रमाणे 14 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी पाणी आडवा पाणी जिरवा याचा संकल्प केला यानंतर  कर्जाची परतफेड केलेल्या स्वरा गटाचे अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला यानंतर बँक मॅनेजर सुयोग वाजे यांनी  बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका गुरव यांनी केले तर प्रास्ताविक किशोर औरादे यांनी केले व आभार रंजना माने यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक सखी मीरा गायकवाड, रजनी काळे, सारिका पाटील, रोहिणी माने, प्रयाग जगताप, शुभांगी परांडे, अनुसया पांचाळ, जनाबाई गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

 
Top