परंडा / प्रतिनिधी : -

छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्मवीर परिवार परंडा यांच्या वतीने जिल्हा परिषद  प्रशाला जवळा (नि.) येथे रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी उपसभापती तथा नुतन सरपंच तानाजी वाघमारे यांनी केले.      

 कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्ताराधिकारी अशोक खुळे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नंदा घाडगे या होत्या या शिबिरात एकूण ८७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सामाजिक जाणिवेतून गेल्या सात वर्षापासून कर्मवीर परिवार या उपक्रमाचे आयोजन करत आहे.समाजाप्रती कृतज्ञतेचे दान या भावनेतून शिक्षक शिक्षिका व युवक ही चळवळ उस्फूर्तपणे राबवत आहेत.यावेळी कर्मवीर परिवाराच्या वतीने रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच मानव विकास मिशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श विस्तार अधिकारी अशोक खुळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्मवीर परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच नूतन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा सन्मान करण्यात आला. या शिबिरात दांपत्य (जोडीने)रक्तदान केले. या शिबिरात दिव्यांग कर्मचारी यांनी ही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

    यावेळी युवराज खाडे, नागनाथ देशमुख तानाजी तरंगे ,भागवत घोगरे,अर्जुन गुंजाळ, प्रफुल्ल झाडबुके ,रामदास होरे,सचिन शेळके महादेव विटकर, शिवा वाघमारे  धनराज बनसुडे यांची उपस्थिती होती.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी चे कर्मचारी उमेश देशमाने अर्चना गुळवे अनुराधा फोके सुप्रिया लगदिवे ताजुद्दीन सय्यद व नागेश चाबुकस्वार ,रणजित चंदनशिव,अविनाश पवार, संतोष वाघमारे, विश्वास वाघमारे, राम राव हुके,तसेच कर्मवीर परिवार,व शिवजन्मोत्सव समिती जवळा यातील  सदस्य यांनी परिश्रम घेतले.

 
Top