तुळजापूर / प्रतिनिधी

 विरोधकांच्या गैरहजेरीत तुळजापूर नगरपालिकेच्या २०२१-२२ च्या ५ लाख ५५ हजार रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ सुचविलेली नाही.

पालिकेची शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी ४ वाजता विशेष सभा पार पडली. यावेळी २०२० - २१ च्या सुधारीत अंदाज पत्रकास व २०२१ - २२ च्या वार्षिक अंदाज पत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. लेखा पाल कृष्णा काळे यांनी अंदाज पत्रक सादर केले. त्यांना अंतर्गत लेखा पाल राहूल मिटकरी यांनी सहाय्य केले. यावेळी ५३ कोटी ९८ लाख ९० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित धरले तर तर ५३ कोटी ९४ लाख ३५ हजार रुपये खर्च धरला आहे. ५ लाख ५५ हजार रुपये शिल्लक अपेक्षित धरली आहे. बैठकीला नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे, पंडित जगदाळे, चंद्रकांत कणे, सचिन पाटील, किशोर साठे, विजय कंदले, संतोष परमेश्वर, अश्विनी रोचकरी, मंजूषा देशमाने, शारदा भोसले आदी नगरसेवक उपस्थित होते. पालिकेच्या निवडणूक खर्चासाठी ३० लाख, पंतप्रधान आवास योजनेसाठी ४ कोटी रुपये, हद्द वाढ भागासाठी ५ कोटी रुपये, भुसंपादन १ कोटी आदीसह अनेक बाबीसाठी तरतूद करण्यात आली आहे.

 
Top