उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र व शिंदे चव्हाण गांधी अॅन्ड कंपनी यांच्या सयुक्त विद्यमाने परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. मारुती अभिमान लोंढे यांनी केले, तर सुञसंचलन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोसिन शेख यांनी कंपनी  व कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.बी. इंदलकर हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी  कोणत्याही मुलाखतीला सामोरे जाताना  सकारात्मक दृष्टिकोन समोर  ठेवावा  असे आवाहन केले हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कंपनीचे विशाल घोडके, प्रा. नारायण सकटे, प्रा. माधव उगीले, उपस्थित होते.

 
Top