तुळजापूर / प्रतिनिधी- 

अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदीरासाठी तामलवाडी गावातुन ६१ हजार रुपयाचा निधी रामभक्तांनी संकलित करुन तो निधी गुरुवार दि.११रोजी  मंहत मावजीनाथ महाराज यांच्याकडे सपूर्द केला.

यावेळी  जिल्हा अभियान प्रमुख हभप बाबुराव पुजारी महाराज पाडुळीकर  श्रीकृष्ण कुलकर्णी धर्माधिकारी सारंग कावरे यांची उपस्थिती होती. या निधी संकलनासाठी तामलवाडी अभियान प्रमुख कारसेवक हभप रामकृष्ण पांडुरंग सावंत महाराज यांच्या मार्गदर्शनखाली तामलवाडी येथील महालक्ष्मी मंदीराचे पुजारी, देविदास गौडा महाराज, हभप केशव नागनाथ गुरव महाराज, दिंडी प्रमुख लक्ष्मण सुग्रीव गायकवाड, मारुती रामकृष्ण सावंत, विठ्ठल भागवत गवळी, तण्मय ञिबंक दिक्षित, राजकुमार वासंत चुंगे, सिध्देश्वर मसुते, भास्कर विष्णू पवार, विकास हरिदास खंडाळकर, सुधाकर अर्जून लोंढे,  गोदावरी रामकृष्ण सावंत आदींनी परिश्रम घेतले.


 
Top