उस्मानाबाद/ प्रतिनिधी

छत्रपतींचा आशिर्वाद घेवून सत्ता स्थापन करणाऱ्या  सरकारने शिवजयंती साजरी करण्यास असणारा विरोध थांबवून राज्यभर शिवजयंती साजरी करण्यास लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्दकराव्यात, छत्रपतींचा आशिर्वाद घेवून सत्ता स्थापन करणाऱ्या  महाराष्ट्र राज्य सरकारने  शिवजयंती उत्सव साजरी करण्यास विरोध केलेला आहे. छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच शिवजयंती उत्सव साजरी करण्यावर अनेक अडचणी लादण्यात आलेल्या आहेत. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका व सांस्कृतिक कार्यक्रम यावर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. 

या राज्यात दारुची दुकाने, नाईट लाईट, बार सुरु झालेले चालतात. त्या ठिकाणी गर्दी     झाली तर सरकार कांहीच बोलत नाही. परंतु छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मात्र जाणून बुजून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. धार्मीक भावना भडकवणाऱ्या  आणी जाती-जाती मध्ये विष कालवणाऱ्या  एलगार परिषद सारख्या कार्यक्रमाना ठाकरे सरकार परवानगी देते परंतु महाराष्ट्राचे दैवत आणि आस्मिता असणाऱ्या  छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीला मात्र अनेक निर्बंध घातले जात आहेत. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी या सर्व जाचक अटीमुळे हे ठाकरे सरकार मोगलाईची आठवण करुन देत आहे याची जाणिव तीन टांगी सरकारला करुन दिली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचा आम्ही सर्व शिवप्रेमी तीव्रपणे निषेध व्यक्त करतो, कोणत्याही अटी शर्तीविना छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी दिली जावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. ही मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर निदर्शने करेल असा इशारा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी  पाटील संघटन सचचिटणीस राहुलजी लोनीकर यांच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी संदीप इंगळे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, सचिन लोंढे, अजिंक्य राजेनिंबाळकर, सुजीत साळुंके, गिरीष पानसरे, गणेश मोरे, बालाजी जाधव, शंकर मोरे, प्रसाद मुंडे व इतर युवा मोर्चाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top