उमरगा  / प्रतिनिधी

 तालुक्यातील १३ गावच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम मंगळवारी (ता.नऊ) झाला. सावळसूरच्या सरपंचपदी करूणा प्रेमनाथ कांबळे यांची तर उपसरपंचपदी जया बाळू माशाळ यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी सतीश शेटगार यांनी काम पाहिले.

कदमापूर - दुधनाळच्या सरपंचपदी सौ. रंजना मारुती मंडले तर  धनराज हरिश्दंद्र बिराजदार  यांची तर उपसरपंचपदी  निवड झाली. श्री. माशाळकर यांनी अध्यासी अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले.

बाबळसूरच्या सरपंचपदी शिवाजी गुरप्पा स्वामी यांची तर उपसरपंच  दादासाहेब ज्ञानोबा सुर्यवंशी यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून कृषी विस्तार अधिकारी श्री. बिडवे यांनी काम पाहिले. पेठसांगवीच्या सरपंचपदी सुमन धनराज सुभेदार यांची तर सिराज निजामोद्दीन शेख यांची उपसरपंचपदी यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून बी.एम. पवार यांनी काम पाहिले.

जकेकुरच्या सरपंचपदी अनिल बिराजदार यांची तर उपसरपंचपदी हरिभाऊ बिराजदार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून एन.एस. राठोड यांनी काम पाहिले. तलमोडमध्ये काँग्रेसचे जिल्हा सचिव अश्लेष मोरे यांच्या आघाडीच्या उषा दिलीप मोरे यांची सरपंचपदी तर गणेश संतराम मोरे यांची उपसरपंचपदी यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून बी. एम. जाधव यांनी काम पाहिले.

बेडग्याच्या सरपंचपदी उषा प्रभाकर माने यांची तर उपसरपंचपदी अनिल दत्तोपंत यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून शाखा अभियंता आर.सी. चव्हाण यांनी काम पाहिले. कराळीच्या सरपंचपदी सुभाष राठोड यांची तर उपसरपंचपदी 

बेबाबाई मुळे यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्री. करबलवाड यांनी काम पाहिले. रामपूरच्या सरपंचपदी जानकाबाई संतराम भोसले यांची तर उपसरपंचपदी नितीन फुलचंद सुरवसे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून डी. डी. चिवडे यांनी काम पाहिले.

सुपतगावच्या सरपंचपदी अंबिकाबाई लामजने यांची तर उपसरपंचपदी बाबुराव हेंडले यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणुन व्ही.जे. राठोड यांनी काम पाहिले.  मूरळीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नैनाबाई कांबळे यांची तर उपसरपंचपदी शमशोद्दिन जमादार यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी महावीर दूरूगकर यांनी काम पाहिले. पळसगावच्या  सरपंचपदी मंजुषा गोविंद गायकवाड यांची तर उपसरपंचपदी अरूण विठ्ठल चव्हाण यांची निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणुन जयंत गायकवाड यांनी काम पाहिले.

थोरलीवाडीच्या सरपंचपदी बालाजी मिसाले यांची तर उपसरपंचपदी फुलचंद यंपाळे यांची बिनविरोध  निवड झाली. पॅनेल प्रमुख दत्ता चिंचोळे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. अध्यासी अधिकारी म्हणुन श्री. राठोड यांनी काम पाहिले.


 
Top