उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद कोषागार कार्यालयामध्ये लेखा व कोषागारे दिन काल मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त आरोग्य विषयक तपासणी,कार्यालयाची सजावट,उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण,गुणवंत पाल्य गौरव सोहळा आणि कोविड कालवधीमध्ये काम केल्याबाबत अधिकारी/कर्मचारी यांना प्रमाणपत्र वाटप असे विविध उपक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करुन करण्यात आले, तर दुपारच्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषदेचे सचिन कवठे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी कोषागार अधिकारी सचिन संदिपान इगे होते. कार्यक्रमास परिविक्षाधीन अधिकारी म.वि.ले.से.गट अ (कनिष्ठ) अमोल आमले,लेखाधिकारी आप्पासो बबन पवार,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आरोग्य विषयक तपासणी कार्यक्रमांमध्ये 70 अधिकारी,कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनधारकांनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पुजा दळवे यांनी केले तर प्रास्ताविक अप्पर कोषागार अधिकारी  निलेश साखरे यांनी केले. अप्पर कोषागार अधिकारी चंद्रशेखर काजळे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी  सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top