उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाविषयक अडचणी व तक्रारींचे निवेदन बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अर्थात बानाई संघटनेकडे सादर करावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए. एच. कांबळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बानाई संघटना प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून या बैठकीत मागासवर्गीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या विविध समस्या, सेवाविषयक अडीअडचणी मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी संघटनेचे टेकाळे जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडे लेखी स्वरूपात समस्या, अडीअडचणी मांडाव्यात, असे आवाहन श्री कांबळे यांनी केले आहे. 

 
Top