उमरगा/ प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन व अल्पसंख्याक समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी सोमवारी (०१) तालुका वीर माहेश्वर जंगम समाज संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळापूर तालुका येथील अणदूर गावातील अल्पवयीन, अल्पसंख्यांक समाजातील एका शालेय मुलीवर गावातीलच तीन नराधमांनी जबरदस्ती बलात्कार केल्याची ही घटना अत्यंत निंदनीय आहे. वीर माहेश्वर जंगम समाजाचे वतीने घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असून सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अन पीडित मुलीचे पुनर्वसन करून कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रवीण स्वामी, उपाध्यक्ष प्रशांत स्वामी, गुरूलिंगय्या स्वामी, वीरभद्र स्वामी, अमर स्वामी, अशोक स्वामी, सुरज स्वामी, शैलेश स्वामी,निजगुण स्वामी, नागेश स्वामी, संगमेश्वर स्वामी, रजनीकांत स्वामी आदींच्या सह्या आहेत.


 
Top