उस्मानाबाद/ प्रतिनिधी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच बंजारा ओबीसी बहुजन समाजाच्या राजकीय नेतृत्वाची नाहक होणारी बदनामी थांबविण्याची मागणी बंजारा समन्वय समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत बंजारा समन्वय समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील भाजपचे काही नेते पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीपूर्वीच व अंतिम निष्कर्ष येण्यापूर्वीच बंजारा ओ. बी. सी. बहुजन समाजातील मंत्री संजय राठोड यांना आरोपी म्हणून व प्रसार माध्यमात बंजारा बहुजन समाजाला बदनाम करण्यावे कट कारस्थान केले जात आहे. याचा निषेध नोंदवून याप्रकरणात तिच्या कुटुंबियांचीही अद्याप कोणतीच तक्रार नसताना कथित ऑडिओ क्लीपच्या आधारे मंत्री संजय राठोड यांची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. यामुळे समाजात अस्वस्थता आहे तरी याप्रकरणात होणारी बदनामी थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर उत्तम चव्हाण , गुलाबराव जाधव , प्रकाश चव्हाण, शशिकांत राठोड , शेषेराव चव्हाण, नेताजी राठोड, डॉ. सुरज चव्हाण, विजय राठोड, विद्यानंद राठोड, हरीश जाधव,अविनाश चव्हाण, दिलीप आडे, अशोक जाधव यांच्यासह बंजारा समाजातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top