उस्मानाबाद  / प्रतिनिधी -

तालुक्यातील बेंबळी येथील रहिवाशी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामलिंगअप्पा गिरवलकर यांच्या पत्नी सौ.कलावती गिरवलकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी शोकाकुळ वातावरणात बेंबळी येथील स्मशानभुमीत अंितम संस्कार करण्यात आले. सोमवार दि. १ फेब्रुवारी रोजी राखसावड्यचा विधी झाला. 

सौ.कलावती गिरवलकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पार्थिवावर अंतिम संस्कार करतेवेळी नातेवाईक, प्रतिष्ठीत नागरिक, समाजातील नागरिक तसेच सामाजिक, राजकिय, पत्रकार, शिक्षक आदी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. 


 
Top