उस्मानाबाद  / प्रतिनिधी -

अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या कासार  मॅरेथाॅन स्पर्धेस प्रतिसाद देत जिल्हाभरातून लहान मुलांसह युवक, युवती व ज्येष्ठांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मॅरेथाॅन मध्ये लहान गटातून राजवीर टंकसाळे, पुरुष गटातून ऋषिकेश नान्नजकर तर महिला  गटातून सारिका मोहिरे यांनी विजेतेपद पटकाविले.

रविवारी सकाळी उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या कासार म‌‌ॅरेथाॅनचे उद्घाटन मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार जगधने, उपाध्यक्ष संतोष कंदले, सचिव प्रवीण गडदे, युवा जिल्हाध्यक्ष महावीर कंदले, सचिव अमित जगधणे, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहलता अंदुरे, दिनेश झरकर, लक्ष्मीकांत हुलजुते आदींसह स्पर्धकांची उपस्थिती होती.

सदरील स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना गुलचंद व्यवहारे व राजकुमार जगधने यांनी टी शर्ट दिले, सचिन कपाळे यांनी अल्पोपहार व्यवस्था केली, वंदना खोबरे व नितीन कोकीळ यांनी सॅनिटायझर व मास्क वाटप केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आदित्य जगधने, किरण कंदले व सुजित झरकर आदींसह पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार जगधने, प्रस्तावना गुलचंद व्यवहारे यांनी तर आभार संतोष कंदले यांनी केले.

या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या असून स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते.

लहान गटात राजवीर शार्दूल टंकसाळे, पार्थ रविद्र मोहीरे, निल शार्दूल टंकसाळे व प्राची रविद्र मोहीरे (सर्व उस्मानाबाद ),

मोठा पुरुष गटात रूषीकेश राजाभाऊ नान्नजकर, निलेश नरहरी नान्नजकर, प्रसाद पंडित नान्नजकर‌ (सर्व  कळंब),

महिला गटातून सारिका रविद्र मोहिरे, प्रियंका संतोष सातपूते, प्रिती अदित्य जगधने ( सर्व उस्मानाबाद ), 

तर आयोजक गटातून गूलचंद व्यवहारे ( तुळजापुर ), संतोष सातपूते ( उस्मानाबाद ), प्रमोद पोते ( कळंब ) आदिप्रमाने आहेत.

 
Top