तुळजापूर / प्रतिनिधी-  

शनिवारी दर्शन पासची मर्यादा संपल्यानंतर ही भाविक मोठ्या संखेने देवीदर्शनासाठी महाध्दारा समोर गर्दी करुन पासेसची मागणी करु लागल्यामुळे काही काळ गोंधळाचे  वातावरण  बनले होते. माञ पोलिस घटनास्थळी आल्यानंतर भाविक तेथुनच देवीला हात जोडुन निघुन गेल्याने वातावरण निवळले गेले.

 कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी  दर्शनपास निम्यावर आणण्याची अमंलबजावणी शनिवारी सुरु झाली होती माञ  शनिवारी सांयकाळी दर्शन पासेस संपल्यानंतर ही भाविकांचा ओघ सुरुच होता माञ ही मंडळी दर्शन पासेस संपल्याचे समजताच आम्ही लांबुन आलो आहोत आम्हाला दर्शन पास संखेवर मर्यादा आणली आहे हे माहीत नाही तरी  दर्शन पासेस देण्याची मागणी खास करुन महिला वर्ग करीत होता.  यावेळी अनेक भाविक व मंदीर कर्मचाऱ्यांनमध्ये शाब्दीक चकमक उडाल्या काही भाविकांनी तर  प्रशासकीय कार्यालयाचा पायरी वर ओटी भरण्याची धमकी दिली. यावेळी पीआरओ नागेश शितोळे व  मंदीर समितीने वारंवार माईक वरुन कोविड पार्श्वभूमीवर दर्शन पासेस संख्या मर्यादित केल्याने व ते संपल्याने  मंदीर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सातत्याने करीत होते. तरीही भाविक ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते अखेर पोलिसांनी महाध्दारा समोरील गर्दी हटवली व शेकडो भाविक दर्शन न करताच निघुन गेले.

भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे -तहसिलदार तांदळे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांनी मोठ्या संखेने न येता परिस्थिती बघुन यावे व प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन तहसिलदार तथा प्रशासकीय व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी केले

 
Top