उस्मानाबाद/ प्रतिनिधी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अर्ज करून शकलेल्या लाखो शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंहजी पाटील व भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. परंतु, जिल्ह्यासह राज्यभरात वाढत असलेला कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे सदरील धरणे आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले.

हे अांदोलन स्थगित करताना भाजपने पालकमंत्री शंकरराव गडाख यांना इशारा देत, जिल्ह्याचे पालक म्हणून या गंभीर व संवेदनशील विषयाबाबत तातडीने संबंधितांची बैठक घ्यावी. शेतकऱ्यांची ही कैफियत मुख्यमत्र्यांपर्यंत पोहचवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून न्याय करावा, अशी मागणी केली.आंदोलनाच्या शनिवारीच्या सहाव्या दिवशी जिल्हाध्यक्ष , सरचिटणीस नितीन भोसले, आदम शेख, राजाभाऊ पाटील, महादेव वडेकर, सीताराम वनवे, राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, सुनिल काकडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.


 
Top