उस्मानाबाद (प्रतिनिधी)

 शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये १९ फेब्रुवारी पर्यंत कांही कार्यक्रम संपन्न ही झाले. परंतू कोवीडच्या वाढत्या रूग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने सांस्कृतीक कार्यक्रमांना स्थगिती देण्याचे आदेश दिल्याने व सामाजिक जबाबदारीतुन शंभूराजे महानाट्य व इतर कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी सांयकाळी तातडीची  पत्रकार परिषद घेण्यात आली. 

या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, प्रकाश जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती देताना समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी यांनी नोव्हेंबर मध्ये नियमांनुसार आम्ही सर्व कार्यक्रम ठरविले होते चला हवा येऊ द्या .त्याच प्रमाणे तीन दिवसाचे शंभूराजे महानाट्य  परंतू जिल्हाधिकारी यांनी वाढत्या रूग्णांची संख्या पाहून २० फेब्रुवारी रोजी सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या नियमानुसार हा आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मोदाणी यांनी सामाजिक जबाबदारी म्हणुन आपण सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करत आहोत, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे युवराज राजे निंबाळकर, राम मुंडे, शाम नवले, विशाल पाटील, रोहीणी कुंभार, प्रसाद मुंडे, अग्निवेश शिंदे, उमेशराजे निंबाळकर, संजय गजधने, प्रा. संतोष मुळे आदी उपस्थित होते.

 
Top