उस्मानाबाद /  प्रतिनिधी  - 

कीर्तन व प्रवचनकार हे चांगल्या समाज निर्मितीचा आधार स्तंभ असल्याने त्यांनी शासनाच्या महाआवास योजनेतून पात्र बेघर लाभार्थ्यांना घरं मिळवेत यासासाठी कीर्तन प्रवचनांतून प्रसार करावा,असे अहवान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी केले.

 उस्मानाबाद येथे कीर्तनकारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यातून कीर्तनकार या भूमिकेतून उपस्थितांना मार्गदशन करताना डॉ. फड यांनी समाजातील दारिद्रय, अज्ञान, बेरोजगारी, रोग, चुकीच्या प्रथा नष्ट होण्यासाठी संत साहित्याच्या प्रसाराबरोबर शासनाच्या योजनांचाही प्रसार करावा असे आवाहन केले.

 शासनाच्या योजनांचाही प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त करुन शासनाच्या विविध योजनांची माहिती कीर्तन प्रवचना सारख्या प्रभावी माध्यमातून झाली तर समाजातील बेरोजगारी, अनिष्ट प्रथा, दारिद्र्य,आत्महत्या, भांडणतंटे इत्यादी कमी होण्यास आणि समज सुदृढ व सुजान होण्यास मदत होईल.शासनाच्या महाआवास योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना,पारधी आवास योजना,शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना तसेच जिल्हा परिषदेतील जलजीवन मिशन, कृषी, नरेगा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, बांधकाम, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, समाजकल्याण विभागाकडील विविध योजनांचा प्रसार करावा.व सदरील योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळाला तर निश्चितच समाजातील अनेक प्रश्न आपोआप कमी होतील असेही डॉ.फड म्हणाले.

 डॉ.फड यांच्या सोबत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवाद तज्ज्ञ हनुमंत गादगे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रोग्रामर मेघराज पवार,एमएसआरएलएम चे समाधान जोगदंड,श्री भांगे, अमोल सिरसट अल्ताफ जीकरे  परिश्रम घेतले.

 
Top