कळंब /प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मा.विरोधी पक्ष नेते भाई उद्धवराव पाटील यांचे नाव उस्मानाबाद येथे होणाऱ्या मेडिकल कॉलेजला देण्यात यावे अशी मागणी सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आली.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना, तहसीलदार कळंब यांच्या मार्फत देण्यात आले.

   दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की भाई उद्धवराव पाटील हे शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे प्रश्न सोडवणारे नेते होते व हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहे.म्हणून आशा एका झुंजार नेत्याचे नाव शासकीय मेडिकल ला देण्यात यावे. या निवेदनावर शे.का.प चे तालुका चिटणीस भाई बाळासाहेब धस, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा भवर, भाजपा चे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राष्ट्रवादी चे तालुका कार्याध्यक्ष सुरेश काका टेकाळे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, शे.का.प चे नेते भाई अड श्रीहरी लोमटे, भाई ज्ञानेश्वर काळे, भाई बाबुराव जाधव, भाई भास्करराव कुरुंद , शाम नाना खबाले, रेवण करंजकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top