उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात मीटर रिडींग न घेताच अंदाजे भरमसाठ विजबिले देण्यात आली,  त्यानंतर  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विजबिले कमी करण्याची घोषणा केली. परंतु वाढीव वीजबिल सक्तीने वसूल करा अन्यथा वीज जोडणी तोडा असे आदेशच राज्य सरकारने महावितरणला दिले आहेत. याविरुद्ध जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा भाजपने महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन उस्मानाबाद जिल्ह्यात  आ.राणाजगजितसिंह पाटील व  आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कार्यालयास  आंदोलन करण्यात आले. यावेळी  जिल्हा अधीक्षक अभियंता महावितरण यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष  काळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अॅड. नितीन भोसले, रामदास कोळगे, अॅड. खंडेराव चौरे, पांडुरंग  पवार,  इंद्रजित देवकते, अनंत देशमुख,  दत्ता देशमुख  सुनील काकडे,   राजाभाऊ पाटिल , प्रवीण सिरसाट,  ओमप्रकाश मगर,  नानासाहेब कदम,  संजय लोखंडे, गजानन  नलावडे, विनायक कुलकर्णी, देवा नायकल, राहुल काकडे,  अभय इंगळे , दाजीप्पा पवार, शिवाजीराव पंगूडवाले, बापू पवार,बालाजी कोरे,सुधीर पाटील, प्रवीण पाठक,संदीप इंगळे , विनोद निंबाळकर, सचिन लोंढे, गिरीश पानसरे, सूरज शेरकर, कुलदीप भोसले, बंटी मुंडे, प्रसाद मुंडे, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, सुजित साळुंके, गणेश मोरे, गणेश इंगळगी, राज निकम, मनोजसिंह ठाकूर, मुकेश नायगावकर, दादा गुंड,अक्षय भालेराव, अमोल राजे, अजित खापरे, शीतल बेदमूथा, ओंकार वायकर, आशिष कोरे, दिनेश लोहार, आकाश शिदूळे, भाजपचे सर्व पदाधिकारी व युवा मोर्चा कार्यकर्ते मोठया संख्येने भाग घेतला 


 
Top