कळंब : ( शिवप्रसाद बियाणी

 देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते.

   सद्या कळंब शहरात घाणीचे साम्राज्य असून , शहरातील प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत.नाल्यांची सफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंग्यू व मलेरिया ची साथ वाढली असून आबालवृद्धांना हा रोग झाल्याने शहरात चिंता वाढली आहे.शहर तात्काळ स्वच्छ करावे , नाल्यांची साफसफाई करावी, नागरीकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी शहरात अस्वच्छ पाणी येत असून या मुळे रोगराई पसरत आहे रोंगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कळंब न. प. च्या मुख्याधिकारी यांना शिवसेनेने निवेदना द्वारे दिला आहे.

  यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, शाम नाना खबाले, नगरसेवक सतीश टोणगे, अनंत वाघमारे, रोहन पारख, बबन नाना जावळे, सुरेश शिंदे, गजानन चोंदे, शिवाजी कदम , अजित गुरव, बबलु चोंदे, रोहित वाघमारे, अनिल पवार, सुनील पवार, अड.मंदार मुळीक, रोहित कापसे , किरण राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top