उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील जहागिरदारवाडी ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीच्या सरपंच पदी शशिकांत राठोड व उपसरपंच पदी अविनाश चव्हाण यांची निवड करण्यात आली. 

 जहागिरदारवाडी येथे महाविकास आघाडीने एकूण ९ जागा लढविल्या. त्यापैकी सर्वच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले. यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य सुवर्णा सुरवसे, दादासाहेब मिसाळ, सुशीलाबाई चव्हाण, नानासाहेब पवार, आशाबाई जाधव, भुराबाई चव्हाण, विमल राठोड आदी उपस्थित होते. ही निवड जाहीर होताच नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. यावेळी प्रतिष्ठित नागरिक जयसिंग राठोड, गुलचंद चव्हाण, शिवाजी जाधव, संजय चव्हाण, अर्जुन रणखांब व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top