उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या मालकीची उस्मानाबाद शहरात सर्व्ह नं. 18 हा संपूर्ण ( 29 एक्कर 22 गुंटे) जमीन आहे. या वर न. प. उस्मानाबाद यांनी ग्रीन झोन टाकलेले असताना या जमिनीवर   बेकायदेशीर आतिक्रमण होत आहे. या संदर्भात अनेक वेळा न. प. उस्मानाबाद कडे तक्रार केलेली आहे. आनेक वेळा पाठपुरावा करूनही आजुन कोणतेही कार्यवाही झाली नाही, तर मठाच्या वादग्रस्त जमिनीबाबत एक व्यक्ती लोकांना फसवून व्यवहार करीत आहे. लोकांनी याबाबत कोणताही व्यवहार करू नये,अशी माहिती वीरशैव जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले यांनी दिली. यावेळी लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंढे उपस्थित होते. 

 शिवानंद कथले यांनी शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी रोजी हॉटेल पुष्पक पार्कमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सर्व न्यायालयातील निकाल ट्रस्टच्या बाजूने लागलेला असताना ही ट्रस्टच्या जागेवर अतिक्रमण करून व फसवूण जागा ताब्यात घेतली जात आहे.या संदर्भात लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे आबा यांच्या नेतृत्वाखाली वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद चे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटले. या वेळी जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण काढण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले आहेत.त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे असल्याचे ही कथले यांनी सांगितले.  या पत्रकार परिषदेत

 वीरशैव जंगम मठ ट्रस्ट चे अध्यक्ष शिवानंद कथले, सचिव श्रीकांत साखरे कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे,  प्रसंन्न कथले,  आंबेडकर कारखान्याचे उपाध्यक्ष  हनुमंत भुसारी, रवी कोरे आदींची उपस्थिती होती.

 
Top