कळंब  / प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या वतीने दि.२४फेब्रुवारी रोजी येथील रोकडेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक व उमेद अभियान पंचायत समिती कळंब यांचे संयुक्त विद्यमाने महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी २२ महिला बचत गटाना ३७ लाख रुपयांचे कर्ज मंजुरीआदेश पत्र शाखा व्यवस्थापक श्रीराम मडके व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

  या वेळी महिला बचत गट मेळाव्यात खामसवाडी, नागझरवाडी,माळकरंजा, बोरगाव, गौरगाव येथील २२ महिला बचत गटाना ३७ लाख कर्ज मंजुरी आदेश वाटप करण्यात आले. खामसवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने या वर्षी ६९ बचत गटांना विक्रमी १कोटी रुपये कर्ज वाटप करुन महिलांना रोजगाराच्या संधी मिळवुन दिल्या. तसेच सदरील मेळाव्यात ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीराम मडके यांनी व उपस्थित मान्यवरांनी महिलां बचत गटाना मार्गदर्शन केले.

 यावेळी शाखा व्यवस्थापक श्रीराम मडके , सहायक गटविकास अधिकारी प्रमोद कुसनेनिवार, उमेदचे तालुका समन्वयक उमेश ठोकळ, विलास ताटे, तेजस कुलकर्णी, बेडके मॅडम,जयश्री कुलकर्णी, धनश्री  निरफळ,संगीता बिक्कड, अनिता शेळके,लता वाघे, सुंदर माळी, हरि भन्साळी यांच्या सह बचत गटांच्या महीला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती होते .

 
Top