उस्मानाबाद/प्रतिनिधी

 आज दि.२५ फेब्रुवारी रोजी नवीन २६ रुग्ण आढळले असून ही संख्या दर दिवसागणिक वाढू लागली आहे. कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांपैकी १४ रुग्ण आज उपचारानंतर बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत १६ हजार ४८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी आजपर्यंत ५७६ जणांना या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपला जीव गमवावा लागला असून मृत्यूचे प्रमाण ३.३४ टक्के आहे. 

आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २७ हजार ५०२ रुग्णांची स्वॅब व रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १७ हजार २२० रुग्ण कोरोना पॉझिटिव निघाले आहेत. कोरोना पॉझिटीव्हचे प्रमाण १३.५१ टक्के आहे. तर १५६ रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आज १४७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या कोविड विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १३ नमुने पॉझिटीव्ह तर १६६ नमुने निगेटीव्ह व ८ नमुन्यांचा अहवाल संदिग्ध आला आहे. तसेच १५३ जणांची रॅपिड अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३ जण कोरोना पॉझिटीव्ह व १४० जण निगेटीव्ह आढळले आहेत. 

जिल्हयात प्रथमच १ महिन्यानंतर रूग्ण संख्येचा २० आकडा पार झाला आहे. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या कोरोना रुग्णांची (स्वॅब-ॲन्टिजेन) तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे - 

उस्मानाबाद -  ७, तुळजापूर - ११, उमरगा - २, लोहारा - ०, कळंब -३, वाशी -  ०, भूम -  ० व परंडा  ३ अशी एकूण २६  रुग्ण संख्या जिल्हयात  आहे. 

 
Top