तुळजापूर / प्रतिनिधी-  

 तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शन पासची संख्या अर्ध्यावर येताच शुक्रवारी देवीदर्नशनासाठी भाविंकांची अलोट गर्दी उसळली होती. परंतु जवळपास   ९५ टक्के भाविकांनी चेहऱ्यावर मास्क लावुन दर्शन घेतल्याचे  दिसुन आले.

 श्री तुळजाभवानी मंदीर संबंधित  काही मंडळीचा रिपोर्ट कोरोना पाँजीटीव्ह आल्याने मंदीर प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्याचे दिसुन  आले. या निर्णयाची  अमंलबजावणी शनिवार दि.२० पासुन होणार असली तरी भाविकांनी दक्षता घेण्यास शुक्रवार पासुन आरंभ केला. सध्या मंदीर सातत्याने सँनिटायझर केले जात असुन विना मास्क मंदीरात फिरणा-यांन दंड आकारला जात आहे. शहरातील भाविक कोरोना प्रादुर्भाव पसरु नये दक्षता घेत असले तरी ग्रामीण भागातील भाविक माञ कोरोना बाबतीत अधिकसा जागरुक नसल्याचे दिसुन आले.

श्रीतुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालया समोर व्हीआयपी वाहने मोठ्या संखेने उभे राहिल्याने येथे वाहतुक कोंडी निर्माण होवुन शोशल डिस्टंस चा बोजवरा उडाला .  कोरोना चा धोका वाढल्यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूरची रुळावर आलेली गाडी पुन्हा घसरली आहे. 

 
Top