उस्मानाबाद / प्रतिनिधी

 कोरोनाला रोखण्यासाठी भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. पण कोरोना लस घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. 

कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

 
Top