उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

अशिक्षित असतानाही संत गाडगे बाबांनी समाज स्वच्छतेचा वसा आयुष्यभर अंगीकारला त्यांचे कार्य सर्वांनी पुढे अंगीकारण्याची गरज आहे.असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.

     उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. 

 पाणी स्वच्छता मिशन विभागातील हनुमंत घाडगे यांनी यावेळी संत गाडगेबाबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यावेळी म्हणाल्या, अशिक्षित असणाऱ्या संत गाडगेबाबांनी हातात झाडू आणि खराटा घेऊन गावागावात स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्या स्वच्छतेचे गुण सर्वांनी अंगीकारावे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला गाव आणि परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.

 यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तूबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दाताळ, पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव, जिल्हा जलसंधारण अधिकारी जोशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देवकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख वरिष्ठ अधिकारी - कर्मचारी जयंती कार्यक्रमास कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षा अंतर ठेवून उपस्थित होते. 

 
Top