उमरगा / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या ५ टक्के सेस मधून दिव्यांगाना अन्न व खाद्य पदार्थ जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणे व आठवडी बाजारासह ग्रामीण भागात कोरोना जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केली आहे.

 सोमवारी दि. २२ रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ५ टक्के सेस मधून दिव्यांगाना अन्न व खाद्य पदार्थ जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणेबाबत तात्काळ लाभार्थी यांना वाटप करण्यात यावे.यामुळे जिल्ह्यातील दोन हजार पेक्षा जास्त दिव्यांगाना याचा लाभ होणार आहे. असा ठराव मांडला व तो मंजूर करुन घेतला. तसेच जिल्हात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू नये यासाठी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन व आठवडी बाजारात जाऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात यावी. सोबत ग्रामपंचायत स्तरावर उपाय योजना राबविण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. यामुळे कोरोना प्रादुर्भावाला आळा घालणेस मदत होणार असल्याचे त्यांनी ठासुन सांगितले व तसा ठराव मंजूर करुन घेतला.

 

 
Top