परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील शेळगांव येथे शेळी वाटप करण्यात आले.प्रथमत: शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. “सामाजिक बांधिलकी हीच आमची संस्कृती, गरीब गरजूंसाठी - हृदयापासून आपुलकी दाखवून नवी दिशा जीवन जगण्याची” या बिरुदावलीला अनुसरून प्रहार जिल्हाध्यक्ष यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने गरीब गरजू होतकरू लाभार्थ्यांना शेळ्या वाटप केल्या.

 गरीब गरजू होतकरू लाभार्थी यांना जीवन जगण्याचे साधन आणि त्यातून कुटूंबाला अर्थ प्राप्ती व्हावी व कुटूंबाची गुजराण होऊन त्यांनी आत्मनिर्भर बनावं या सद्भावनेतून शेळ्या वाटप करण्यात आल्या.लाभार्थींना शेळी देताना एक अट ठेवली ती अशी की, पुढच्या वर्षी आम्हाला त्या शेळीची फक्त एक पाठ द्यावी,जरी बोकड झाले तरी एक द्यायचे जेणेकरून ते विकून दुसरी शेळी घेऊन पुढील वर्षी संघटनेच्या दोन व लाभार्थी यांचे कडून येणा-या दोन असे चार लाभार्थी,पुढे चार चे आठ  लाभार्थी अशा रीतीने हा उपक्रम संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्याचा प्रहार संघटनेचा मानस आहे. लाभार्थीं दोन्हीही विधवा भगिनी आहेत स्वाती पवार मौजे पांढरेवाडी व प्रियंका दैन मौजे शेळगांव ता.परंडा येथील आहेत. या कार्यक्रमात शेळगाव नगरीचे नुतन सरपंच सौ.सुलोचना शेवाळे व उप सरपंच राजेंद्र जगताप यांचा ही प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी परंडा पंचायत समिती सभापती अनुजा दैन,सतिश दैन, ज्येष्ठ विष्णू (नाना) शेवाळे,  माणिकबाबा विद्यालयाचे प्राचार्य गुरूदास काळे, डॉ.लहू शेवाळे,शांतीनाथ वाघमारे,अकबर शेख, प्रहार राज्य सह-समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले,जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, महिला प्रमुख ज्योती देशमुख, तालुका नेते लक्ष्मण औताडे, शहाजी झगडे, मनिषा कुलकर्णी, निलेश कुलकर्णी,अमोल रणशूर,  तानाजी तरंगे,अमोल अंधारे,बाळासाहेब घोगरे,भाऊसाहेब सुर्यवंशी, शिवाजी पंडित,गणेश भाग्यवंत,धनराज बनसोडे, सिद्धेश्वर मेदने,संदिप जरांडे आदि.शिक्षक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण औताडे सर यांनी तर आभारप्रदर्शन धनंजय आंधळे यांनी केले.

 
Top