भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कसबे तडवळे येथील स्मारकाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परंडा येथील नायब तहसिलदार सुजित वाबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.22,व 23 फेब्रुवारी 1941 साली जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे महार - मांग वतनदार परिषद घेतली होती.या गावातील प्राथमिक शाळेत दोन दिवस मुक्काम केला होता. आणि म्हणून या शाळेस पर्यटन स्थळ व स्मारक घोषीत करण्यात आले आहे.स्मारकातील क्रांती स्तंभ व ग्रंथालय या करिता 85,32,223 निधी 1916 रोजी मंजूर केला आहे. मात्र सदरील काम अद्याप सुरू करण्यात आले नाही.तरी हे काम तत्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओहळ, उपाध्यक्ष कुंडलिक शिंदे, शहराध्यक्ष अजय बनसोडे, नवनाथ कसबे, युवराज कसबे, कुमार गायकवाड, रणजित गायकवाड, भैरवनाथ यादव, अजित धेंडे, ग्राम पंचायत सदस्य भाऊराव ओहळ, रघुनाथ माने, लक्ष्मण गायकवाड, शरद सरवदे, नितीन ओहळ, अमोल गायकवाड, लक्ष्मण भोसले, हरी भाऊ साळवे,अशोक अलात,अशोक सोनवणे, अंकुश गायकवाड, अजिंक्य कोळगे, सतीश पटुळे, कुणाल शिंदे,अभिजित कांबळे, ऋषिकेश बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.