उस्मानाबाद/ प्रतिनिधी

चालू 2020-21 च्या हंगामामधील तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने सहा हजार रुपये प्रती  क्विंटल दर निश्चित केला आहे.या खरेदीसाठी नाफेड तर्फे जिल्हयात तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.या केंद्रांवर दि.28 डिसेंबर 2020 पासून ऑन-लाईन नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे.तेव्हा या हमीभाव खरेदीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी ऑनलाईन करावी,असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज बाजपेयी यांनी केले आहे.

 शेतकऱ्यांनी सातबारा,आठ अ चा उतारा,(तलाठीच्या सही-शिक्यासह),आधारकार्डची झेरॉक्स,राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स,नोंदणीसाठी चालू असलेला मोबाईल क्रमांक या कागदपत्रांसह अधिकृत केलेल्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी.

   उस्मानाबाद तालुक्यासाठी उस्मानाबाद शहरातील तालुका शेतकरी सह.संघलि., भूम तालुक्यासाठी भूम शहरातील श्री.शिवाजी भूम तालुका शेतकरी सह.ख.वि.संघ.वाशी तालुक्यासाठी वाशी येथील तालुका शेतकरीसह.संस्था.लि.लोहारा तालुक्यासाठी नागूर येथील यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादन विकास सहकारी संस्थाम. गुंजोटी येथील विविध कार्य सेवा सह संस्था लि.कानेगांव येथील जगदंब खरेदी विक्री सह संस्था.लोहारा. तुळजापूर येथील शेतकरी सह.ख.वि.संघ.लि.कळंब तालुक्यासाठी कळंब येथील एकता खरेदी विक्री सहकारी संस्था. कळंब तालुक्यासाठी शिराढोण येथील तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ लि. पारगांव येथील कै.महारुद्रा मोटे कृ. उ. वि. प्र. स. सं. म.पारगांव. उमरगा तालुक्यासाठी श्री.स्वामी समर्थ सर्वसेवासह.सं. म.., ईट येथील तनुजा महिला शेतीपुरक से. पु. स. सं.सोत्रेवाडी या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी.


 
Top