उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे गेल्या वर्षी ही एका मुलीवर बलात्कार झाला होता. परंतू त्या पिढीतेला ही न्याय मिळाला नाही, अखेर त्या मुलींच्या वडीलाने आत्महत्या केली. तर परवाच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी रात्री अणदूर येथेच होता. परंतू पोलिसांनी त्यास पकडले नाही, मनाला वेदना देणाऱ्या घटना घडत असताना कांही राजकीय लोक, तर कांही पोलिस आरोपींना अभय देण्याचे काम करीत आहेत, असा गंभीर आरोप भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशा उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. 

अणदूर येथे नुकताच एका अल्पवयीन मुलींला घरातून उचलून नेहून तीघा जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तर तिसरा आरोपी मात्र फरार असल्याचे सांगितले जात आहे. चित्राताई वाघ, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. माधुरी गरड, अंजली बेताळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अनिल काळे, अॅड. दिपक आलुरे,  आदींनी पिडीत परिवाराची भेट घेतली. त्यानंतर उस्मानाबाद मध्ये प्रतिष्ठाण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यावर ही गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री  माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे वारंवार म्हणतात. परंतू राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही. चंद्रपूर, अणदूर, नांदेड, सातारा, पारनेर, लातूर येथे बालात्काराच्या घटना घडल्या यांची जबाबदारी कोन घेणार ? नुसते कायदे आणुन काय होणार नाही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करने आवश्यक आहे. मुंबई पोलिस यांची तुलना स्कॉटलँड पोलिसां सोबत होते. परंतू मुंबई पोलिस मोबाईल टॉवर लोकेशनवर आरोपी पकडतात. एखाद्या आरोपींचे टॉवर लोकेशन मिळाले नाही तर तो आरोपी नाही का ?  असा प्रश्न उपस्थित करून गृहमंत्री स्वत:च आरोपीला क्लिन चीट देत आहेत. त्यामुळे रक्षकच भक्ष्काची भुमिका घेत असल्याची टिका ही त्यांनी केली. 

रेणु शर्मा विषयी बोलताना खोट्या बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेवरपण पोलिसांनी कार्रवाई करने आवश्यक आहे. पण सर्व महिलांकडे या दृष्टीकोनातून पाहू नये, असा सल्ला ही वाघ यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजनाथसिंह राजेनिंबाळकर, अॅड. नितीन भोसले  उपस्थित होते.   

 अणदुर ग्रामस्थांनी दिले निवेदन 


 तुळजापूर  तालुक्यातील  अणदुर ग्रामस्थांच्या वतीने बलात्कार करणाऱ्या आरोपींना अटक करून पीडितेला न्याय देण्याची मागणी जिलाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top