उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 शहरातील भोसले हायस्कूलच्या भव्य प्रांगणात मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती २०२१ च्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव व मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून  महिलांसाठी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. 

 समितीच्यावतीने  महिलांच्या खास पसंतीचा कार्यक्रम खेळ पैठणीचा “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम विजेत्या सौ. बालिका संदीप शिंदे यांना (पैठणी साडी )बक्षीस म्हणून देण्यात आली.तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी सौ. माधुरी शीतलकुमार  आयवळे यांना (सोन्याची नथ), तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी सौ. अनिता महेश शिंदे (चांदीचा करंडा) सोन्याची नथ व चांदीचा करंडा हे प्रायोजक (स्पॉन्सर) कालिका ज्वेलर्स.  आधी भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

 व्यासपीठावर समितीच्या अध्यक्षा सौ प्रेमा ताई सुधीर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अस्मिता कांबळे, रूपाली आवले मॅडम (अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद), विद्यमान आमदार मा. कैलास पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ शुभांगी कैलास पाटील, डॉ. प्रा. सुलभा देशमुख, डॉ स्मिता गवळी, अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय,डॉ. सौ. मंजुळा पाटील, रोहिणी कुंभार उपशिक्षणाधिकारी श्रेया पाटील अतुल कावरे डॉ दीपिका सस्ते, रेहनीमूसा शेख, राज निकम ,मनोज देशमुख अभय तांबे लैला शेख , धनश्री कोळपे मनोज उंबरे दिलीप आदटराव  शहरातील नगरसेवक तसेच प्रतिष्ठित महिला आदी मान्यवरांची  उपस्थिती होती.  आभार प्रदर्शन देशमुख मॅडम ने व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील पाटील व त्यांचे सहकारी तसेच समितीच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top