उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चिखली (ता.उस्मानाबाद) ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असुन बळीराजा पॅनेलच्या माध्यमातुन माजी सरपंच देविदास जाधव यांनी गावाची सत्ता हाती घेतली आहे.सरपंचपदी शिवसेनेच्या वृंदावणी जाधवर तर उपसरपंचपदी उत्रेश्वर जाधव यांची बहुमताने निवड झाली.

चिखली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीप्रणित बळीराजा पॅनेलने अकरा पैकी सात जागेवर विजय मिळविला होता.(ता.नऊ)रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता,त्यानुसार ही प्रक्रिया पार पडली. निवडणुकीमध्ये गुप्त मतदानाची मागणी झाल्याने त्या प्रमाणे ही मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली.निवडणुक निर्णय अधिकारी निलेश नागले यांनी ही भुमिका पार पाडली. मतदानामध्ये सरपंचपदासाठी वृंदावणी जाधवर यांना सात   तर विरोधातील मार्तंड भोजने यांना चार मते पडली.तेवढ्याच फरकाने उत्रेश्वर जाधव यांना उपसरपंचपदासाठी मतदान झाले. बहुमताने ही निवडणुक बळीराजा विकास पॅनेलने जिंकत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केले.वृंदावणी जाधवर या शिवसेना पक्षाच्या असुन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या परिवाराला सरपंचपदाची संधी मिळाली आहे.जिल्हाप्रमुख तथा आमदार असलेल्या कैलास पाटील यांनी निवडणुकीमध्ये महत्वाची भुमिका घेतली होती.माजी सरपंच देविदास जाधव यांना सोबत घेत गावात शिवसेनेची सत्ता स्थापन केली.शिवसेनेचे गावात प्राबल्य असले तरी ग्रामपंयातीमध्ये उलट चित्र पाहयला मिळत होते. यावेळी आमदार पाटील यांनी घेतलेल्या भुमिकेचा शिवसेनेला चांगला फायदा झाल्याचे चित्र आहे.


 
Top