परंडा / प्रतिनिधी :- 

दि .२५ फेब्रुवारी २०२१ येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये नगरपरिषद परंडा व श्री संत भगवान बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वसमत जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत स्वच्छता संदर्भात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील आयक्यूएसीचे चेअरमन प्रा.डॉ.महेशकुमार माने  उपस्थित होते.तर व्यासपीठावर समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे , प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद सिटी समन्वयक महेश एकशिंगे,श्री संत भगवान बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वसमत या संस्थेचे प्रकल्प अधिकारी अमोल बोंदर,भैरवनाथ बोंदर  तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ प्रकाश सरवदे, प्रा.डॉ.अक्षय घुमरे ,प्रा.डॉ.सचिन चव्हाण, प्रा.संतोष काळे ,प्रा.सज्जन यादव ,प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे आदी उपस्थित होते .  

      या स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेसाठी एकूण 52 विद्यार्थी तर निबंध स्पर्धेमध्ये एकूण 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.प्रमूख पाहूणे महेश एकसिंगे यांनी स्वच्छता संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर अध्यक्ष समारोप करताना प्रा.डॉ .महेशकुमार माने यांनी स्वच्छता आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे. याविषयी माहिती सांगत सर्वांना स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी स्वच्छता नागरिकांची जबाबदारी (कचरामुक्त परंडा शहर ) ,आपले कोरोणा योद्धे, माझे कुटुंब माझी जबाबदारी ,माझी वसुंधरा ,प्लास्टिक बंदी ,आणि स्वच्छ सर्वेक्षण 2021 या विषयावर  स्पर्धा घेण्यात आली.  

  या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास १५०० / - रुपये आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास ११०० रुपये आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास 701 / - रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच जे विद्यार्थी सहभागी झाले आहेत त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे डॉ.महेशकुमार माने यांनी सांगीतले.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे पारीतोषिक देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी दिली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 
Top