उस्मानाबाद / प्रतिनिधी:

भारत सरकार संरक्षण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय सैनिक बोर्ड  यांच्याकडील दि.10 फेब्रुवारी-2021 च्या आदेशानुसार,कोविड-19 साथीची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन,पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद तुंगार  यांनी दिली.

 जिल्हयातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा यांनी त्यांच्या सर्व पात्र पाल्यांचे अर्ज www.Ksb.gov.in या वेबसाइटवर भरुन त्याची प्रिंट (printed copy) 20 एप्रिल 2021 पर्यंत कार्यालयात सादर करावी,असेही त्यांनी म्हटले आहे.


 
Top