उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील अशासकिय अनुदानित शासन मान्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालयास जोडून असलेले कनिष्ठ महाविद्यालये यांचे 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता अकरावी आणि बारावी विद्यार्थ्यांचे ई.बी.सी.सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.तेथे येऊन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन येथील लेखाधिकारी (शिक्षण) बी.आर.मुंढे यांनी केले आहे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील 2020-21 या वर्षाचे इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ई.बी.सी. तपासणी कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी तुळजापूर तालुक्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कुल, दि. 23 व 24 फेब्रुवारी 2021 रोजी उमरगा-लोहारा तालुक्यासाठी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरगा, दि. 25 आणि 26 फेब्रुवारी 2021 रोजी कळंब तालुक्यातील शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब, दि. 02 आणि 03 मार्च 2021 रोजी भूम-वाशी तालुक्यासाठी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम, दि. 04 मार्च 2021 रोजी परंडा तालुक्यातील शिक्षण महर्षी रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा आणि दि. 05 मार्च 2021 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद.
ई.बी.सी.तपासणीसाठी लातूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेली 2020-21 च्या संच मान्यतेच्या छायांकित सुस्पष्ट प्रत साक्षांकनासह सादर करणे आवश्यक आहे.शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी 2020-21 मध्ये केलेल्या पटपडताळणी अहवालाची सत्य प्रत, यु-डायसचे माहितीची सत्य प्रत विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव, विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासोबत सक्षम प्राधिकारी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्रासह प्रस्ताव वेळापत्रकामध्ये नमुद केलेल्या दिनांकास ई.बी.सी. कॅम्पच्या स्थळी माहितगार कर्मचाऱ्यासह उपस्थित राहून प्रस्तावाची तपासणी करुन घ्यावी, असेही श्री. मुंढे यांनी कळविले आहे.