तेर/ प्रतिनिधी- 

शेतातील पत्र्याच्या शेडमधील लोखंडी आडूला दोरीच्या सहाय्याने तरुणांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक २२ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील प्रमोद सुर्यकांत आबदारे ( वय २७ ) यांने तेर शिवारातील वसंत मदने यांच्या सर्वे नंबर १९६ मधील शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली सोमवारी सकाळी निदर्शनास आली .या प्रकरणी मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .या प्रकरणी पुढील तपास तेर येथील पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक तरटे करीत आहेत .


 
Top