परंडा / प्रतिनिधी- 

परंडा तालुक्यातील अनाळा येथील जि.प. शाळेत शालेय विदयार्थीनींना जि.प.च्या महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या  फंडातून सायकल वाटपाचा कार्यक्रम दि.२३ रोजी घेण्यात आला.

जि.प.चे उपाध्यक्ष तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांच्या हस्ते सात मुलींना सायकल वितरीत करण्यात आल्या. यावेळी सरपंच जोतीराम क्षिरसागर, उपसरपंच दादासाहेब फराटे, उदयोजक बिबिशन शिंदे, ग्रा.पं. सदस्य कल्याण शिंदे, विनोद कदम, अशोक शिंदे, चांगदेव चव्हाण ,अजित शिंदे, युवा नेते भाऊसाहेब पाटील, निशिकांत क्षिरसागर, परंडा भाजपा कार्यकारणी सदस्य हारीभाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, दशरथ क्षिरसागर, हनुमंत क्षिरसाागर, अंबादास क्षिरसागर, मिठू कदम,शिक्षक -साबळे, चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते 
Top