उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वा. करण्यात आलेले आहे.

जिल्हयात 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक आणि  इतर कारणांकरीता वैधता प्रमाणपत्रांसंदर्भात अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज दि. 01 ऑगस्ट 2020 पासून स्वीकारण्यात येत आहेत.अर्ज निहाय सेवा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.

अनेक अर्जदार अद्यापही वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. अर्जदारांना अर्ज भरताना अनेक अडचणी येतात. उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा आणि कोणते दस्ताऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी उस्मानाबादच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,स्तरावर ऑनलाईन वेबिनार आयोजित केला आहे.ऑनलाईन वेबिनारचे आयोजन Zoom Meeting App वर करण्यात आले आहे.

सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महासंचालक,धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

 
Top