उस्मानाबाद/ प्रतिनिधी

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर सभागृहात एल्गार परिषदेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. शरजिल उस्मानी यांनी कार्यक्रमात भारतीय संघराज्यविरोधात व हिंदू विरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली. शरजिल उस्मानी यांनी हिंदू समाज सडलेला आहे, अशा प्रकारचेे धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले आहे. हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक १५३ ए व २९५ ए (आणि इतर लागू होण्याऱ्या कलम) अ नुसार गुन्हा ठरते. शरजिल उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केली आहे.यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षापासून एल्गार नावाचा कार्यक्रम होत आहे. या परिषदमध्ये नेहमीच विध्वंसक व समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे सातत्याने समाज विघातक विचार मांडले जात आहेत, अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये.


 
Top