उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आपल्या दारी, कळवा आपली समस्या काही, या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन पक्षाचे नेते डाॅ.प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शिवजयंतीदिनी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे अावाहन पालिकेतील गटनेते गणेश खोचरे, शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे अादींनी केले अाहे.


 
Top