उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथे आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून जिल्हा परिषद कन्या शाळेच्या संरक्षक भिंतींच्या दहा लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, चंद्रप्रकाश जमाले, विजयसिंह जमाले, माजी उपसरपंच तुळशीदास जमाले, संजय जमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार ओमराजे यावेळी म्हणाले की, शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामुळे उस्मानाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकार होत आहे. या महाविद्यालयासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून लवकरच सर्वसामांन्यांना अल्प खर्चात उपचार घेता येणार आहेत. गोरगरीबांच्या मुलांना येथे वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहेत. तसेच जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत प्राधान्यक्रमाची मर्यादा वाढवून कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावापर्यंतची कामे यात समाविष्ट करून कामे हाती घेण्यासाठीचे शासन परिपत्रक निर्गमित झाले असून कामाला सुरुवात होणार आहे. २०२३ पर्यंत ७ टीएमसी पाणी दुधाळवाडी व रामदरा साठवण तलावात येणार आहे. तसेच जिल्ह्यात अवकाळीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानभरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीचे फार्म मित्र अॅप मोबाइलवर डाउनलोड करुन नुकसानीचे फोटो ७२ तासाच्या आत अपलोड करुन नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी संजय जमाले, किशोर डाळे, रामादादा जमाले, पं. स. सदस्य सुधीर करंजकर, ग्रापं. सदस्य विशाल जमाले, दिलीप करंजकर, शरद होगले, सय्यद, धायगुडे, धनाजी होगले, नंदकुमार पवार, नेताजी चव्हाण, गणेश करंजकर, शिवाजी नाळे, अप्पा मनके, पांडुरंग विभुते, धनाजी शिंदे, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरुवात होणार आहे. २०२३ पर्यंत ७ टीएमसी पाणी दुधाळवाडी व रामदरा साठवण तलावात येणार आहे. तसेच जिल्ह्यात अवकाळीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानभरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीचे फार्म मित्र अॅप मोबाइलवर डाउनलोड करुन नुकसानीचे फोटो ७२ तासाच्या आत अपलोड करुन नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी संजय जमाले, किशोर डाळे, रामादादा जमाले, पं. स. सदस्य सुधीर करंजकर, ग्रापं. सदस्य विशाल जमाले, दिलीप करंजकर, शरद होगले, सय्यद, धायगुडे, धनाजी होगले, नंदकुमार पवार, नेताजी चव्हाण, गणेश करंजकर, शिवाजी नाळे, अप्पा मनके, पांडुरंग विभुते, धनाजी शिंदे, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top