उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराजांच्या कार्याची व इतीहासाची गोडी निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी “छञपती शिवाजी महाराजांचे कार्य” या विषयावरील भीत्तीपञिकेचे प्रकाशन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते २२फेब्रुवारी रोजी करण्यात आले.सूञसंचालन भैरवनाथ माकोडे यांनी केले आभार वैभवी कोकाटे हिने मानले.यावेळी प्रा.निल नागभिडे,प्रा.विकास सरनाईक,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर व इतीहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top